टीम महाराष्ट्र देशा : किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरून सध्या राज्यात मोठे वाद आणि राजकारण सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ कीर्तनकर बंडा तात्या कराडकर यांनी नवीन वादाला सुरुवात केली आहे. राज्यातील महिला नेत्यांबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर चंदनी टिळा, पांडुरंगाचे भक्त आणि मानत आणि तोंडात ही असली भाषा. यामुळे कीर्तनातून प्रबोधन करणारे कीर्तनकार समाजाला कुठे घेऊन चालले आहेत हा प्रश्न, बंड्यातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण होत आहे.
काल (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना कराडकर यांनी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांवर विशेष करून महिला नेत्यांवर वादग्रस्त आरोप केले. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे या दोघी दारू पितात, सुप्रिया सुळे राजकारणात येण्या पूर्वी दारू पिऊन रस्त्यात पडत होत्या अशी देखील त्यांनी भाषा वापरत आरोप केले. पुढे त्यांनी मी सर्वांना आव्हान करतो की, मला त्यांनी विचारावे, माझ्याकडे पुरावे आहेत, मी त्यांना ते देऊ शकतो. अशी भूमिका घेतली. साताऱ्यात त्यांनी महाराष्ट्र सरकार विरुद्ध ‘दंडवत दंडुका’ आंदोलन देखील छेडले आहे. याच बंडातात्या कराडकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात महाराष्ट्र सरकारच्या वाईन विक्री निर्यायावर टीका करत आता तुम्ही शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात सुद्धा वाईन द्या असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बैलांची नावे देखील दिली होती.
ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाहीतर गुण लागला अशी म्हण म्हणत, दोनही मंत्र्यांवर शाब्दिक टीका केली. अजित पवार पवळा यांना मुख्यमंत्री ढवळ्या शेजारी बांधला, आणि त्यांना दारू विकण्याचा गुण लागला. असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले.
याच पार्श्वभूमीवर बंडा तात्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला होते. बंडा तात्या विरुद्ध राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला चपला मारत निषेध व्यक्त केला. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या मुडद्याची दखल घेत, त्यांना दोन दिवसात लेखी अहवाल देण्यास सांगितले. तसेच सकाळी ११ च्या सुमारास बंडा तात्या यांना अटक केली गेली.
आता मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांचे खापर ते पत्रकारांवर फोडत आहेत. पत्रकारांनी मला भरीला पाडले म्हणून मी जास्त बोलून गेलो. पत्रकार हे नेहमीच जास्तीचे प्रश्न विचारण्यासाठी असतात. परंतु आपण किती आणि कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यावी हे बंडा तात्याला कळू नये का ?
महत्वाच्या बातम्या:
- वादग्रस्त वक्तव्यानंतर किर्तनकार बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात
- ऋतुराज गायकवाड याला मिळणार महत्वाची जबाबदारी ??
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मुख्यमंत्री मुंबईचे आहेत म्हणण्यापेक्षा…’
- अफेअरच्या चर्चांनंतर रिंकू राजगुरुचं ‘कजरा महोब्बतवाला … खास Reel झाले व्हायरल
- “हे” काही खेळ असणार नाहीत २०२८ ऑलिंपिकचा भाग; आयओसीकडून यादी जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

