नवी दिल्ली : टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून मुक्त झाल्यानंतर विराट कोहली आणखी धोकादायक फलंदाज बनू शकतो, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर Gautam Gambhir) ने व्यक्त केला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) T20 विश्वचषकानंतर स्वेच्छेने कर्णधारपदाचा त्याग केला होता, परंतु त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये कर्णधारपद चालू ठेवण्याचे बोलले होते. मात्र, बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना टी २० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार हवा होता आणि याच कारणामुळे कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माला (Rohit Sharma) नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.
एका माध्यमाशी बोलत असताना, गौतम गंभीरला व्हाइट-बॉल क्रिकेटमधील विराट कोहलीच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना गंभीर म्हणाला, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये रोहितने जी भूमिका बजावली तीच भूमिका आता कोहली बजावणार आहे. त्याच्याकडे कर्णधारपद नाही. त्यामुळे विराट कोहलीला मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळू शकते. कर्णधारपदाचे दडपण त्याच्या खांद्यावर नसल्यामुळे तो आत्ता अधिक धोकादायक ठरू शकतो.
अनुभवी सलामीवीर अजूनही विश्वास ठेवतो की कोहली सर्व फॉरमॅटमध्ये एक मजबूत फलंदाज म्हणून कायम राहील. गंभीर म्हणाला, मला खात्री आहे की त्याचा भारताला अभिमान वाटेल, तो आता क्रिकेटमध्ये आणखीन धावा करत राहील. गौतम गंभीर म्हणाला की,कोहली आता कर्णधार नसेल पण तो ज्या तीव्रतेने खेळतो ते कमी होणार नाही.
मला खात्री आहे की भारताला विराट कोहलीचा सर्वोत्तम खेळ पाहायला मिळेल, मग ते लाल चेंडूचे क्रिकेट असो किंवा पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट. तसेच एवढ्या प्रदीर्घ कालावधीत त्याने ज्या प्रकारचा आवेश दाखवला आहे, तो कर्णधार असो वा नसो, विराट कोहलीमध्येही तुम्हाला तेच पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’


