मुंबई : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे दारू पिऊन नाचतात, असेही बंडातात्या म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर बंडातात्यांनी माफी मागितली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे न्यायालयात बंडातात्याविरोधात खटला दाखल केला आहे.
याबाबत रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ‘महिलासन्मान : बंडातात्या कराड यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात महिलाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात माझ्याकडून वकीलामार्फत पहिला खटला दाखल.’ असे ट्विट रुपाली पाटलांनी केले आहे.
#महिलासन्मान :बंडातात्या कराड यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात महिलाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात माझ्याकडून वकीलामार्फत पहिला खटला दाखल.@MHD_Press@SakalMediaNews@thodkyaat @LoksattaLive @lokmat @AzadMarathi @abpmajhatv @TV9Marathi pic.twitter.com/cK8khJTcyn
— Rupali patil thombare (@Rupalispeak) February 5, 2022
बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर साताऱ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बंडातात्या कराडकर यांनी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करत त्यांनी सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता.
त्यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधाने केले होते. ते म्हणाले होते, ‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात. आणि मी हे सिद्ध करू शकतो. माझं चालेंज आहे की सुप्रिया सुळेनीं मला खोट सिद्ध करून दाखवावं. त्या दारू पितात हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्या पुराव्यांची गरज नाही. त्याचे फोटो ढिगाने पडले आहेत. राजकारणात यायच्या अगोदर त्या रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या दिसायच्या.’ असा दावा बंडातात्यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

