पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी करताना अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकादरम्यान कोहलीने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका होताना दिसत आहे.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. पंचांसोबत वाद घालण्यावरुन लॉयड यांनी विराटवर टीका केलीये. विराट पंचांचा अनादर करतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारतीय कर्णधार पंचांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतो, असं ते म्हणाले.
विराट कोहलीने अलिकडेच इंग्लंडविरोधात झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यानंतर सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सूर्यकुमार यादवचा झेल इंग्लंडच्या डेविड मलानने पकडला, त्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. पण तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचं सांगत सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सूर्यकुमारला बाद दिलं. त्यावरुन बोलताना विराटने, “जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे की नाही, तर मैदानावरील पंच आउट असा सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतात…सॉफ्ट सिग्नल निर्णायकच का हवा…मला कळत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही (I Don’t Know) असं का नाही सांगू शकत”, अशी टीका विराटने केली होती. त्यावरुनच डेविड लॉयड यांनी विराटवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती, परमबीर सिंह यांचा याचिकेत मोठा दावा
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘फडणवीस… उगाच लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा विश्वास ठेवत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

