Share

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती, परमबीर सिंह यांचा याचिकेत मोठा दावा

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेतली आहे. परमबीर सिंगी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजच (२४ मार्च) सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 26 मार्च रोजी सुनावणी होणार होती. पण, याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आली.

परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात १३० पानांची रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात दुसरा मोठा दावा केला आहे. तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असे परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, परमबीर सिंग यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीची निःपक्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी या प्रकरणी सतत्या तपासणे आवश्यक आहे. पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

रश्मी शुक्ला, ज्या त्यावेळी राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनी पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यावेळी या प्रकरणी अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करून पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असेही परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!