Share

हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात विराटने नाणेफेक गमावली होती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हेडिंग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटने नाणेफेक गमावण्याची मालिका खंडीत केली. यापुर्वी विराटने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात एकदाही नाणेफेक जिंकली नव्हती. या सामन्यात नाणेफेक जिंकत विराटने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने संघात काहीही बदल केले नाही. दुसऱ्या कसोटीतील संघ तिसऱ्या सामन्यात कायम ठेवला.

तर इंग्लंडच्या संघात मार्क वुडच्या जागी क्रेग ओव्हरटनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर डॉमीनीक सिब्लेच्या जागी डेव्हिड मलनचे संघात पुनरागमन झाले आहे. मार्क वुडच्या जागी साकीब महमुदला संघात स्थान मिळणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र असे घडले नाही. तसेच टीम इंडियात जडेजाच्या जागी अश्विनला जागा मिळणार अशी चर्चा सुरु होती

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!