मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. काल याबाबतचे पत्रक आयकर विभागाने पोस्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोबतच मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकृत प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा,’ अशी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. ‘अल जेब्रिया कोर्टा संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत भुजबळांवर आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही.’ असे स्पष्टीकरण तपासे यांनी दिले आहे.
तसेच ‘भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान ताबडतोब थांबवावे,’ असा इशाराही तपासे यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
