पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागे एका राजकीय नेत्याचा दबाव आहे, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला बळाचा वापर करून अटक करण्याची सूचना देत आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची सभा होती. त्या सभेनंतर पत्रकार परिषद सुरू होण्याआधी पालकमंत्री अनिल परब यांचे दोन फोनवर संभाषण झाले. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. दरम्यान, भाजपने आता परब यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे. राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.राणे यांच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचा आरोप होत असलेल्या अनिल परब यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिलाय.
अनिल परब अश्या देत होते सूचना
“हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन (अर्ज) नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा,” असं अनिल परब फोनवर बोलताना ऐकू येत होतं.
दरम्यान, कुरघोडीच्या खेळात अनिल देशमुखांपाठोपाठ अनिल परब यांच्यावरही गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून परब यांच्यावर होणारी संभाव्य कारवाई म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरच हल्ला ठरेल, असे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये भाजपने जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न जनआशिर्वाद यात्रेतून भाजप राबवतेय – राष्ट्रवादी
- अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटावर केआरकेची टीका, म्हणाला…
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
