मुंबई: मागील वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वसामान्य माणसांवर आर्थिक संकट ओढवले. अनेक लोक बेरोजगार झाले. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये लवकरच इंजिनिअरच्या पदासाठी भरती होणार असल्याचे समोर येत आहे.
अधीक्षक अभियंता या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी उमेदवारांना 15 सप्टेंबर 2021 या तारखेच्या आधी अर्ज करणे अपेक्षित आहे.
इच्छुक उमेदवारांनी मुख्य महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, RBI, केंद्रीय कार्यालय इमारत, 20 वा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 या पत्यावर अर्ज करावा. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय देखील करता येऊ शकतो यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा. त्यामुळे या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करावा.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानकडून विंडीजचा १०९ धावांनी पराभव, मालिका १-१ अशा बरोबरीत
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

