Share

‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा

Published On: 

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला होता. दरम्यान यावर मंत्री भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

१०० कोटींच्या इमारतीवर कारवाई होत आहे, त्यांच्या सोबत माझं नाव जोडलं गेलं आहे.पण त्या इमारतीच्या मालकाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ही मालमत्ता त्यांच्या कंपणीची आहे. भुजबळ कुटुंबियांचा काही सबंध नाही. आमच्या केसेस 2005 पासून सुरू आहेत , यात नवीन काही नाही. भाजप असे मंत्र्यांवर कारवाईचे दावे का करत आहे ते कळत नाही. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

तसेच तुमच्या यंत्रणा स्वतंत्र आहेत. कोर्ट स्वतंत्र आहे तर तुम्ही कस म्हणता हे करू? म्हणजे त्या यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत आहेत, असं म्हणावं लागेल असंही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याचेच खंडन भुजबळ यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!