Share

‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रात राजयकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या सर्व नाट्या दरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. यामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली.

राणेंच्या अटकेनंतर हे सर्व वातावरण थंड होईल असं वाटत असताना आता ठाण्यातील पोस्टरची चर्चा होत आहे. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत.

ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर हे पोस्टर झळकत असून यात ‘बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे… आज, उद्या, कधीही…मा. उद्धवजींसोबतच’, अशा आशयाचे पोस्टर ठाण्यात झळकत आहेत. पोस्टरवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नावं आहेत.

नरेश म्हस्के आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांकडून हे पोस्टर ठाण्यातील उड्डाणपुलांवर लावण्यात आले आहेत. राणेंना झालेली अटक म्हणजे त्यांना देण्यात आलेला राजकीय शह असल्याचं या पोस्टरमधून शिवसैनिकांकडून दाखवून देण्यात आलं आहे. त्यामुळे या पोस्टरची आता राज्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!