Share

‘विराट सामन्यातील परिस्थितीनुसार त्याच्या खेळात बदल करू शकतो’

Published On: 

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान इंग्लंड मध्ये साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड दरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. मागील दोन वर्षापासुन सुरु असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येउन पोहोचली आहे. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज या मालिकेच्या बाबतीत वेगवेगळे भाकित व्यक्त करत आहे.

दरम्यान भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी विराटच्या कामगिरीवर भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यातील प्रतिभा आणि कामगिरीतील सातत्य हे वाखाणण्याजोगे आहे. त्याच्याइतकी मेहनत मी इतर कोणाला घेताना पाहिलेले नाही. परंतु, विराटमधील मला एक गुण सर्वात भावतो, तो म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे. तो सामन्यातील परिस्थितीनुसार त्याच्या खेळात बदल करू शकतो. याबाबतीत इतर कोणाचीही त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही, असे राठोड म्हंटले आहेत.

जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहे. न्युझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे सुरु आहे. यादरम्यान इंग्लंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघ सध्या विलगीकरणात आहे. आगामी काळात भारतीय संघ आपाआपसात सराव सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!