Share

‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

लंडनमध्ये पोहचताच लोकेश राहुलने ट्विट करून लंडनमध्ये सुरक्षित पोहोचल्याचे म्हटले आहे. ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय संघाला सक्तीच्या विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. जवळपास तीन दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात त्यांना हॉटेलमध्ये स्वतंत्र राहावे लागणार आहे.

दरम्यान, पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही. असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांची खेळण्याची पद्धत ही वेगळी आहे. पुजारा हा सावध आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो, तर पंत नेहमी आक्रमक पणे खेळताना दिसतो. दोन्ही शैलीतील खेळाडू जेव्हा मिसळून खेळतात, तेव्हाच संघाला यश मिळू शकते, . पुजारा अगदी शिस्तबद्ध आहे. त्याला वेगळे काही तरी करायला आवडत नाही. याऊलट पंत निडर आहे. तो धोका पत्करायला घाबरत नाही. हे दोघे केवळ क्रिकेटच्या मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही असेच आहेत. परंतु, तुम्हाला क्रिकेटचे सामने जिंकण्यासाठी दोघांचीही तितकीच गरज असते, असे राठोड म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!