Share

विराट- अनुष्का संस्थेमार्फत करणार कोरोनाग्रस्तांसाठी मदत

Published On: 

मुंबई: देशात कोरोनाच्या संकटामुळे रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा असल्याने अनेकांचा यामुळे मृत्यू झाला. या परिस्थितीत अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले. काही कलाकार बेड आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. काही कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

विराट आणि अनुष्का एका संस्थेमार्फत कोरोनाग्रस्तांसाठी पैसे जमा करण्याचं काम करत आहेत. हे पैसे गरजूंच्या उपचारासाठी खर्च केले जाणार आहेत. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत अनुष्काने लिहिले की, ‘आपला देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणादेखील खूप अडचणींचा सामना करत आहेत.’

तसेच पुढे ती म्हणाली की, ‘आपल्याच लोकांना असं त्रासलेलं आणि ऑक्सिजनशिवाय तडफडताना पाहून आमचं मन तुटत आहे. त्यामुळे मी आणि विराटने मिळून एक उपक्रम सुरू केला आहे.’ असे सांगत त्यांनी लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार पैसे दान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. जेणकरून जास्तीत जास्त जमा झालेली रक्कम कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी उपयोगाची ठरू शकेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!