औरंगाबाद : कोरोना काळात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध ठेवून गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळण्याच्या दृष्टीने रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी गुरुवारी (दि.६) स्वत: रक्तदान करीत जनतेला रक्तदानाविषयी आवाहन केले. कोरोनाच्या काळात रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रक्ताच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी (दि.७) मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (मसीआ) सभागृहात राईझिंग इंटरप्रेनर ग्रुप व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने वाळूज येथील उद्योगांतील कर्मचाऱ्यांच्यासाठी रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत इतर आजराने ग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये व रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध राहण्यासाठी सर्व निरोगी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे. कोरोना संकट काळात उद्योगनगरीतील अधिकारी, कर्मचारी या रक्तदान शिबीराच्या माध्यमातून पुढे आले आहेत. हे कौतुकास्पद असून या शिबिरात रक्तदानासाठी सर्व नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकरी चव्हाण यांनी यावेळी मसीआच्या पदाधिकारी यांचेशी संवाद साधत उद्योगासंबंधीत अडचणी जाणून घेतल्या. तसेच उद्योगांनीही या कोरोना संकटकाळात सीएसआर माध्यमातून कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन २८ दिवसाचा कालावधी झाल्यानंतर स्वत:या शिबिरात रक्तदान केले.
जिल्हाधिकारी यांनी स्वत:हून केलेले रक्तदान जनतेला खूप प्रेरणादायी असून कोरोनावरील लस घेण्याआधी व लस घेतल्यानंतरच्या योग्य कालावधीत नागरीक उत्साहाने रक्तदान करतील असा विश्वास रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मसीआ चे अध्यक्ष अभय हंचनाळे व इतर अधिकारी यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यादा बिल आकारत रुग्णांची फसवणूक करणाऱ्या ‘या’ १४ रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीसा!
- चीन्यांमुळे आणखी एक संकट; अनियंत्रित रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता !
- तामिळनाडूमध्ये स्टॅलीन यांच्या मंत्रिमंडळात गांधी, नेहरूंना संधी !
- ‘अजितदादा धडाडीचे नेते पण उपमुख्यमंत्री झाल्यावर ते का बदलले हे मला समजत नाही’
- ‘ज्येष्ठ नेते मराठा आरक्षणाच्या निकालावर साधं एक स्टेटमेंटही का देत नाहीत ?’


