औरंगाबाद : शहराच्या विविध भागातून चोरांनी दोन दुचाकींसह एक कार लांबवली. या तिन्ही घटना आठवडाभरात घडल्या. जमालोद्दीन नुरोद्दीन काझी (३२, रा. अल्ताफ कॉलनी, गारखेडा) यांनी १ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिकलठाणा, जुना बीड रोडवरील लकी पार्क येथे विना लॉक दुचाकी (एमएच-४०-ई-९५४९) उभी केली होती.
चोराने त्यांची दुचाकी संधी साधून लांबवली. तसेच शुभम अशोक किर्तीकर (२३, रा. बनेवाडी) याने २६ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास वाळुज एमआयडीसीतील इलेजेन्ट कोर्टीन कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच-२०-सीके-६३५६) उभी केली होती.
चोराने त्याची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली. तर दादाराव भावराव सोनवणे (५५, रा. मिसारवाडी) यांनी ५ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घराबाहेर कार (एमएच-२०-ईई-३६७८) उभी केली होती. चोराने मध्यरात्री बनावट चावीने सोनवणे यांची कार लांबवली.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

