Share

‘नवाब मलिक, तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का?’

Published On: 

मुंबई : दिवसेंदिवस राज्यात करोनाचं संकट वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांनी तर कडक लॉकडाउन लावला आहे. मात्र अद्यापही नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे.

काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेरमध्ये संचारबंदी काळात पोलीस पथक गस्त घालत होतं. मात्र, दिल्ली नाका परिसरात गर्दी जमा झाल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी त्यांना गर्दी का केली असं विचारल्यावर जमावाने पोलिसांवरच हल्ला केला आहे. हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. तर हल्लेखोरांनी त्यानंतर पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली. या प्रकाराचे व्हिडीओ व्हायलर झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘धोरण लकवा आणि निर्णय लकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहात बसणार? महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का? संगमनेरमध्ये पोलिसांनी अजूनही कठोर कारवाई केली नाही. नवाब मलिक तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का? संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल,’ असा प्रहार भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

यासोबतच उपाध्येंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. ‘संगमनेरमध्ये कोरोना नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई कोठे ? नाना पटोले तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय ? दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केला. पोलीस दल हादरले, पण गृहखाते ढिम्म आहे,’ असा संताप देखील उपाध्येंनी व्यक्त केला आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!