🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्ये तर कोरोनासमोर हतबल झालेत. ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शच्या कमतरतेमुळे नागरिकांचा बळी जात आहे. ही चिंताजनक बाब आहे. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन हे दोघेही त्यांची जबाबदारी नाकारत असल्याचा आरोप केला आहे,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. त्यानूसार देशात एका दिवसात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आलेय. यानंतर चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे अजूनही नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना पहिला डोसही मिळत नाहीये आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.
18 से 44 के बीच के किसी को भी टीका नहीं लग रहा है।
अन्य राज्यों में भी स्थिति बहुत अलग नहीं है।
प्रधानमंत्री और स्वास्थ्य मंत्री अपनी जिम्मेदारी से हाथ खड़े कर, लोकतांत्रिक सिद्धांतों का मजाक उड़ा रहे हैं।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 7, 2021
शिवाय १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या कोणालाही लस मिळत नाही. इतर राज्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरु आहे’ असा आरोप चिंदबरम यांनी केलाय.
तर दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आता मोदींना थेट आव्हान दिले आहे. सोरेन यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना परिस्थितीवर काय चर्चा झाली ट्विटद्वारे सांगितले आहे. ‘आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं’, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाशी लढा, मोदींसोबत नाही’, केंद्रिय मंत्र्यांचा हेमंत सोरेन यांना टोला
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल
- ‘संजय काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आलीये’, ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक संतापले
- ‘कोरोनाशी लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, एकट्या मोदींना ते अशक्य’, नवाब मलिकांचा टोला
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
