Share

नेहरु भवन परिसरातील व्हीआयपी रस्ता मोकळा, मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई!

Published On: 

औरंगाबाद : महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारी (दि.२१) सकाळी शंभू नगर येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारी बाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी नाल्या मधील बांधकामाची स्थळ पाहणी केली. व याबाबत नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊन कारवाई करण्याबाबत सूचित केले. तसेच नेहरू भवन परिसरातील व्हीआयपी रस्त्यावरील अतिक्रमणे देखील काढण्यात आली.

शंभू नगर येथील २० बाय ६० या आकारा मध्ये एकूण आठ आरसीसी कॉलम टाकून गणेश हिरालाल जाधव हे बांधकाम करत होते. सदर बांधकामामुळे पावसाचे पाणी जाण्यास जागा नव्हती आणि भविष्यात जोरदार पाऊस झाल्यास पूर्ण शंभू नगर मध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत पंचनामा करून सदर बांधकाम हे नाल्यामध्ये आहे याची खात्री झाल्याने ते पूर्णपणे निष्कासित करण्यात आले.

नेहरू भवन परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. याठिकाणी नेहरू भवन, कॅन्सर हॉस्पिटल जवळ अनधिकृतपणे चार चाकी हातगाड्या, लोखंडी टपरी व साधे पत्राचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत आज दुपारी कारवाई करून सदर व्हीआयपी रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. या ठिकाणाहून जवळपास किरकोळ स्वरूपाचे सहा ते सात टेबल हातगाड्या व इतर किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले. हि कारवाई प्रशासक अास्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर एस राचतवार, इमारत निरिक्षक सय्यद जमशेद यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!