Share

‘भोसलेंची मालमत्ता जप्त झाली हा कोणासाठी दुःखद दिवस ?’; भाजप आमदाराच्या ट्विटने सस्पेन्स वाढला

Published On: 

मुंबई : अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेल्या आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे असलेल्या बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. आज ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची याआधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात ईडीने अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना ईडी कार्यालयात बोलावून घेतले होते. यावेळी त्यांची दहा तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. याचदरम्यान पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

दरम्यान, अविनाश देशमुख त्यांच्यावर आज करण्यात आलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे भाष्य केलं आहे. ‘अविनाश भोसलेची मालमत्ता जप्त झालीय. कुणाकुणासाठी बरं हा दु:खदायक दिवस असेल…’भोसले एव्हिएशन’च्या विमानांनी उडणारे, बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे आता ‘भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?’ असं विचारणार की नाही?,’ असं भातखळकर म्हणाले आहेत. त्यांच्या या ट्विटचा नेमका निशाणा कोणाच्या दिशेने आहे, हे मात्र जरी त्यांनी नमूद केलं नसलं तरी बड्या घराण्यातील व्यक्तींच्या नावांची कुजबुज सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!