लातूर: जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी २१ जुन ते १ जुलै दरम्यान कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती येथील कृषि विभागाने दिली आहे. या मोहिमे अंतर्गत महत्वाच्या खरीप पिकांचे लागवड तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषी विभागाच्या योजनांबाबत शेतकऱ्यांना शेतीशाळा, कार्यशाळा, चर्चासत्रे, वेबिनार, प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात येणार आहे.
२१ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम खालील वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार आहे. संपुर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच मोहीमीची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी सदर मोहीमेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि विभागाने केले आहे.
२१ जुन रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान), २२ जुन रोजी बीजप्रक्रीया, २३ जुन रोजी जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, २४ जुन रोजी कापुस एक गाव एक वाण (कापुस पिकाचे क्षेत्र असणा-या तालुक्यासाठी), भात लागवड तंत्रज्ञान (भात पिकाचे क्षेत्र असणा-या तालुक्यासाठी), ऊस लागवड तंत्रज्ञान (ऊस पिक असलेल्या तालुक्यासाठी), कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान (कडधान्य व तेलबिया क्षेत्र असणाऱ्या तालुकत्यासाठी).
त्यानंतर २५ जुन रोजी विकेल ते पिकेल, २८ जुन रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ जुन रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बॅंकेतील शेतकऱ्यांचा सहभाग तसेच ३० जुन रोजी तालुक्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, १ जुलै रोजी कृषी दिन आणि मोहीमेचा समारोप कार्यक्रम असणार आहे. या मोहीमेची कार्यपद्धती, सुक्ष्म नियोजन, सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना तालुका कृषि कार्यालयात उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मनाप्रमाणेच वसुंधरेलाही समृद्ध करावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे औरंगाबादकरांना आवाहन!
- महाराष्ट्रात आज १३,७५८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- पोटच्या मुलांनी नाकारले, अखेर ‘त्या’ आजींना समाजसेवकांनी दिला खांदा!
- विद्यार्थ्यांना मिळणार फीमध्ये तब्बल ३५ % सूट; आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांना यश
- शहराबरोबरच औरंगाबाद ग्रामीणमध्येही व्यापऱ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद


