सिल्लोड : जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या सौंदर्यात भर पडावी, येथील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी व स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी अजिंठा लेणी परिसरात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रविवारी (दि.२०) ह्यू पॉंइंट येथे बीजारोपण करण्यात आले. यावेळी येत्या काही दिवसात जिल्हाभरात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येइल. तसेच हा प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यभर झकास पठार हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून तसेच सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या धर्तीवर अजिंठा येथील ह्यू पॉईंट येथे विविध फुलझाडांचे बीजारोपण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. या प्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अजिंठा डोंगर रांगांची ह्यू पॉईंट वरून पाहणी केली. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजन किती महत्वाचे आहे हे सगळ्यांना कळले. अजिंठा डोंगर रांगात नैसर्गिक ऑक्सिजन ला चालना देणारी तसेच दुर्मिळ वनस्पती असलेल्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे असल्याने अजिंठा डोंगर रांगेत किमान २५ लाख वृक्ष लागवड करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला दिल्या.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अजिंठा लेणी तसेच ह्यू पॉइंट येथे रोजगाराच्या संधी नवीन व्यापार संकुल निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. झकास पठार उपक्रमातील सदस्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्वतः बीजारोपण केले. सोबतच त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून जमिनीची मशागत केली. सत्तार यांनी ट्रॅक्टर चालविले तर त्यांच्या मागे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मानधरे बसले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मनाप्रमाणेच वसुंधरेलाही समृद्ध करावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे औरंगाबादकरांना आवाहन!
- महाराष्ट्रात आज १३,७५८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- पोटच्या मुलांनी नाकारले, अखेर ‘त्या’ आजींना समाजसेवकांनी दिला खांदा!
- विद्यार्थ्यांना मिळणार फीमध्ये तब्बल ३५ % सूट; आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांना यश
- शहराबरोबरच औरंगाबाद ग्रामीणमध्येही व्यापऱ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद


