Share

औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मिळणार लस!

Published On: 

औरंगाबाद : आता शासन निर्देशानुसार औरंगाबाद महापालिकेने नव्याने आदेश काढत उद्यापासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे २१ जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारने लसीची उपलब्धता विचारात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शनिवारपासून लसीकरण सुरू केले होते. सध्या पालिकेकडे ५० हजार लसीचा साठा उपलब्ध आहे.

जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील लसीकरणासाठी आठ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. शहरात पालिकेने लसीकरणासाठी ११५ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. आजवर ३ लाख ३५ हजार १६९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आता राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने शहरात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शनिवारपासून लसीकरण मोहीम हाती घेतली होती. यासाठी प्रायोगिक तत्वावर १० केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

आता शासनाच्या निर्देशानुसार उद्या २२ जूनपासून शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रावर टोकन पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर २०० लस उपलब्ध असणार आहेत. २०० टोकन झाल्यानंतर नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये. असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. नागरिकांनी लसीकरणाला येताना सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक कार्ड यांपैकी एक फोटो असलेला ओळखीचा पुरावा म्हणून सोबत आणावा. लस घेण्यासाठी येताना जेवण करुन यावे. काही आजार असल्यास केंद्रावरील डॉक्टरांना कळवावे. अशा सूचना केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!