उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास सरकार आहे. परंतु कॉंग्रेस सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून बोचरी टीका केली.
तर काल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं लेटरबॉम्ब समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सध्या सत्तेत सोबत असलेले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा खळबळजनक आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.
महाराष्ट्रातील अशा राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अचानक दिल्ली गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लगावले जात आहेत. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भाजप सरकारच्या काळात आपल्याला त्रास झाल्याचं म्हटले आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसताना सत्तेचा गैरवापर करुन मला अशाच पद्धतीने त्रास देण्यात आला. असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ शेतकरी आंदोलन प्रकरणात माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नव्हती. नोटीस न मिळाल्यामुळे मी शेवटच्या तारखेला हजर झालो नाही. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या २० ते २५ जणांच्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली आणि मला त्रास दिला.’ असघानाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
तसेच ‘सत्ता मिळवण्याकरता आणि राखण्यासाठी होणारे हे प्रकार दुर्दैवी असून त्यावर आळा घालणं गरजेचे आहे.५ वर्षांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. परंतू शिवसेनेची सत्ता असताना गृहमंत्री कोणाकडे होतं आणि सत्ता कोण चालवत होतं हे सर्वांना माहिती आहे. मी इतक्या खोलात जाणार नाही पण मला या प्रकरणात खूप त्रास झाला’ अशा प्रकारचे विधान करून त्यांनी यावेळी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भोसलेंची मालमत्ता जप्त झाली हा कोणासाठी दुःखद दिवस ?’; भाजप आमदाराच्या ट्विटने सस्पेन्स वाढला
- महाराष्ट्रात आज १३,७५८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- पोटच्या मुलांनी नाकारले, अखेर ‘त्या’ आजींना समाजसेवकांनी दिला खांदा!
- विद्यार्थ्यांना मिळणार फीमध्ये तब्बल ३५ % सूट; आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांना यश
- शहराबरोबरच औरंगाबाद ग्रामीणमध्येही व्यापऱ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

