Share

उमरग्यात पुन्हा नियमांचे उल्लंघन; ४३ हजाराचा दंड वसूल!

Published On: 

उस्मानाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यात सरकारने संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही नागरिक नियमांचे उल्लंघन करत बाहेर फिरत आहेत तसेच दुकाने देखील दिलेल्या वेळे पेक्षा जास्त वेळ उघडी ठेवत आहेत, त्यामुळे नागरिक दुकानांमध्ये गर्दी करतायत. अशा वेळेस कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना देखील नियमांचे उल्लंघन केले जात आये. अशांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

उमरगा शहरात व तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाची वाढत चाललेली साखळी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असताना वेळेत विनामास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शारीरिक अंतर अन् दुकानासमोर मार्किंग न करणे आदींसह जनता कर्फ्यू, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यांच्या कारवाई करण्याची माेहीम राबवण्यात आली. मोहिमेतून ४३ हजार २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शासनाने वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. परंतु, बऱ्याच व्यावसायिकांकडून कोविड आदेशाचे पालन होत नव्हते. विनामास्क दुचाकी चालवणाऱ्या व फिरणाऱ्या व्यक्तींसह दुकानासमोर मार्किंग नसणे, मास्क नसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शारीरिक अंतराचे उल्लंघन करणे अशा ११४ जणांवर दंडात्मक कारवाई करत ४३ हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी जनता कर्फ्यूच्या काळात बाजारपेठेत, रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!