🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. मटार यावेळी हार्दिक पांड्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हार्दिक पांडय़ा व कुलदीप यादव या दोघांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही ‘हार्दिक सध्या गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीचे ओझे हाताळण्यासाठी त्याला संघात घेण्यात आले होते, मात्र तो प्रयोग फसला.’ त्यामुळेच कसोटी संघात त्याचा विचार झालेला नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला अष्टपैलू म्हणून भारतीय संघातील प्लेइंग अकरामध्ये स्थान मिळायला हवे, असे विधान शार्दुलचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केले आहे. स्पोर्ट्सकिडाशी बोलताना ते म्हणाले, “एक प्रशिक्षक म्हणून माझी शार्दुल ठाकूरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे अशी इच्छा आहे. कारण त्याची कामगिरी चांगली आहे. तो बॉल आणि बॅटने कामगिरी करू शकतो. जर तो अष्टपैलू म्हणून खेळला तर तो भारतीय संघासाठी एक प्लस पॉईंट ठरेल. पण सर्व काही संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांवर अवलंबून आहे.”
ते म्हणाले, “भारतीय संघात सध्या अष्टपैलू खेळाडूंचा अभाव आहे. हार्दिक र्वी अष्टपैलू म्हणून खेळत असे, पण आता दुखापतीमुळे तो गोलंदाजी करत नाही. संघाला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यक आहे. त्यामुळे माझ्यामते हा खेळाडू शार्दुल ठाकूर आहे. पण चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला सलग सामन्यात संधी मिळायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- “मोर्चा काढणार म्हणजे काढणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ!”, आ. मेटेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
