🕒 1 min read
मुंबई : कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत. काही परिवारातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले असल्यामुळे परिवारावर आर्थिक संकटं कोसळली आहे. यामध्ये राज्य सरकारने अशा कुटुंबीयांना १ लाखाची मदत करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. यानंतर आता कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे असल्याने असा महापालिकांनी जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे राज्यावर मोठे संकट आलं आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. कोरोना मुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकार ने सरसकट तसा आदेशच दयायला हवा अशी मागणी केली आहे. तर सरकारने / महापालिकांनी जनतेप्रति आपली जबाबदारी झटकू नये असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकार ने सरसकट तसा आदेशच दयायला हवा. सरकार ने / म्हापलिकांनी जनतेप्रति आपली जवाबदारी झटकू नये.@TV9Marathi @zee24taasnews @CMOMaharashtra @abpmajhatv @News18lokmat @mieknathshinde
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) May 24, 2021
दरम्यान, कालच बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत मागणी केली होती की, ‘कोरोना ने अनेक परिवार उध्वस्त केले, यातील अनेकांची आर्थिक स्थिती देखील हलाखीची आहे त्यामुळे कोरड्या सहानुभूतीची नव्हे तर भरीव मदतीची आवश्यकता आहे. नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल परंतु तेवढ्याच खर्चात (900 करोड) मृत्युमुखी पडलेल्याना प्रत्येकी 1 लाख रुपये देता येतील व ते देणे उचित ठरेल, अशाने त्यांना खरच मोठा आधार भेटेल’, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
महत्वाच्या बातम्या
- रेड झोनमधील ‘या’ १४ जिल्हे वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- “मोर्चा काढणार म्हणजे काढणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ!”, आ. मेटेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

