बीड: मोबाइलवरील चॅटिंगमधून केज येथील अक्षय पौळ हा एका तरुणीसोबत शिवीगाळ करून बोलत होता. शिवीगाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर तरुणीचा भाऊ व इतर नातेवाईक अक्षय पौळच्या घरी येऊन त्याला समजाऊ लागले मात्र अक्षय व त्याच्या घरच्यांनी लाकडाच्या ढिलप्याने मारहाण करायला सुरुवात केली. याप्रकरणी केज पोलिसांत दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाला आहेत.
लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बळी जगन्नाथ कळसे यांच्या बहिणीसोबत केज शहरातील फुलेनगर भागातील अक्षय शंकर पौळ हा मोबाइलवर चॅटिंग करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे २२ मे रोजी दुपारी १२.३० वाजता कळसे हे इतर नातेवाइकांसह पौळ याच्या घरी आले होते. त्यांनी तुमच्या मुलाला चांगले सांभाळा, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षय शंकर पौळ, लता शंकर पौळ, विजय शंकर पौळ यांनी लाकडाच्या ढिलप्या उचलून मारहाण केल्याने बळी कळसे व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांचे डोके फुटले. तर त्यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या, अशी फिर्याद बळी कळसे यांनी दिल्यावरून अक्षय पौळ, लता पौळ, विजय पौळ यांच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक आशा चौरे करत आहेत.
दुसऱ्या गटाचे अक्षय शंकर पौळ याने दिलेल्या फिर्यादीनुसार २२ मे रोजी दुपारी १२.३० वाजता विष्णू प्रकाश कळसे, नागेश कळसे, पपिता प्रकाश कळसे, सोन्या वैरागे, सुनीता वैरागे हे संगनमत करून पौळ याच्या घरी आले. फोनवर चॅटिंग करणे व शिवीगाळ करण्याच्या कारणावरून अक्षय पौळ यास लाथाबुक्याने मारहाण केली. तर विष्णू व सोन्या या दोघांनी काठीने मारून दुखापत केली त्या सर्वांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशी फिर्याद अक्षय पौळ याने दिल्यावरून विष्णू कळसे, नागेश कळसे, पपिता कळसे, सोन्या वैरागे, सुनीता वैरागे या पाच जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रुक्मिणी पाचपिंडे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘इंग्लंडमध्ये ही चूक करु नको’ ; रोहित शर्माला मोलाचा सल्ला
- बीडमधल्या ‘या’ कोविड केअर सेंटरमधून रुग्णांनी काढला पळ!
- “मोर्चा काढणार म्हणजे काढणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ!”, आ. मेटेंचा इशारा
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

