Share

Vinayak Raut | विनायक राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात! म्हणाले, “नारायण राणे जात असताना…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिंदे गटातील रामदास कदम तर उद्धव ठाकरे गटातील विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यात वाद सरु आहेत. हे नेते एकमेकांवर टीका करण्याची एक देखील संधी सोडत नाहीत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर घणाघात केला आहे. शिवसेनेतील गद्दारीची किड रामदास कदमांनी रुजवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

“रामदास कदम यांची सुरु असलेली बडबड आम्ही फार गांंभिर्याने घेत नाही. कारण शिवसेनेतील गद्दारीची कीड सर्वप्रथम कोणी रुजवली असेल तर ती रामदास कदम यांनी रुजवली आहे. नारायण राणे जात असताना रामदास कदम ४ दिवस त्यांच्या बंगल्यावर राहून इतर सगळ्यांनी शिवसेनेतून फुटून राणेंकडे या, असे सांगत होते,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

रामदास कदमांचे भास्कर जाधवांना प्रत्युत्तर

ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर रामदास कदम यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं म्हणत हल्ला केला होता. अशातच रामदास कमद यांनी जाधवांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे. नासक्या डोक्यातून नासके विचार येतात, असं म्हणत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. भास्कर जाधवांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परत, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आले. उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी हे बाटगेपणा दाखवत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!