🕒 1 min read
गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनतेला कोरोनाच्या महामारीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोरगरिबांना अन्नधान्याच्या संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते होते. आणि ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत रेशन लाईन खाली येणाऱ्या लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. ज्या कुटुंबीयांकडे रेशन कार्ड नव्हते त्यांना देखील नंतर या योजनेत जोडण्यात आले. ताज्या अपडेट नुसार, ही योजना आणखी 3 महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाची सूचना
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही योजना 3 महिने वाढवल्यास सुमारे 45 हजार कोटींचं ओझं वाढेल. या योजनेअंतर्गत गोरगरिबांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यात कपात करायची चर्चा होती, मात्र सध्या तरी यात काहीच बदल करण्यात येणार नाही.
तब्बल 80 कोटी लोक या योजनेशी जोडले गेले आहे
केंद्र सरकारच्या या योजनेशी जवळपास 80 कोटी लोक जोडले गेले आहेत. ही योजना मार्च 2022 मध्येच संपणार होती. पण त्यानंतर सप्टेंबर पर्यंत ही योजना सुरू ठेवण्यात आली. आणि आता शासनाच्या निर्णयानंतर या योजनेत डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत धान्य कसे उपलब्ध होते
या योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना अतिरिक्त 5 किलो धान्य मिळते. दर महिन्याला मिळणाऱ्या रेशन सोबतच अतिरिक्त ते 5 किलो धान्य मिळते. ज्या रेशन दुकानातून तुम्ही तुमचे रेशन धान्य घेत आहात तिथूनच तुम्हाला हे रेशन मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | शरद पवारांनी केवळ ‘ही’ गोष्ट केली की ते पुन्हा सत्तेत येतात – सुप्रिया सुळे
- Uday Samant । विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करावा – उदय सामंत
- Lata Mangeshkar Award | उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
- Anil Deshmukh । अनिल देशमुखांची दिवाळी गोड होणार नाही?; जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला
- Ramdas Kadam | “भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे”
- Devendra Fadnavis । मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde । मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री आणि आमदारांना झापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
