Share

World Heart Day | वर्ल्ड हार्ट डे, काय आहे या दिवसाचे विशेष महत्त्व? जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या हृदयाचा विचार करावा, त्याची काळजी कशी घेता येईल, हृदय जास्तीत जास्त निरोगी ठेवून त्याचा सकारात्मक कसा उपयोग करता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो.

वर्ल्ड हार्ट डे का करतात साजरा

वर्ल्ड हार्ट डे चे आयोजन ‘वर्ल्ड हार्ट फेडरेशन’ तर्फे केले जाते. जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हृदयरोगांसंबंधीची माहिती पोहोचवणे हा दिवसाचा मुख्य उद्देश आहे. कारण हृदयविकार हे जगातील सर्वात मोठे मृत्यूचे कारण मानले जाते. जगभरात दरवर्षी सुमारे 1.86 कोटी लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे सांगण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

वर्ल्ड हार्ट डे थीम 2022

दरवर्षी वर्ल्ड हार्ट डे एक थीम घेऊन साजरा केला जातो. या वर्षीची या दिवसाची थीम आहे ‘ Use heart for every heart ‘, म्हणजेच प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा.

हृदयाची काळजी कशी घ्यावी

  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी शरीराला पोषक आहार द्यावा.
  • जर तुमचे वजन जास्त असेल तर वजन थोडे कमी करावे, कारण त्यामुळे हृदय निरोगी राहते.
  • दररोज तुमच्या दिनचर्यानुसार व्यायाम करावा.
  • तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका. आणि निरोगी हृदयासाठी दारूपासून सुद्धा दूर राहा.
  • तुमच्या रक्तातील शुगर आणि बीपी नियमितपणे तपासा.

हृदयरोग कसे टाळता येऊ शकतात

  • तुमच्या धकाधकीच्या जीवनात ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवा.
  • शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नेहमी नियंत्रणात ठेवा.
  • जास्तीचे वजन वाढू नये याची काळजी घ्यावी.
  • आपल्या आहाराची विशेष काळजी घेत आवश्यक ती पोषक घटक खा.

हृदयविकाराचे झटके का येतात

एका संशोधनात असे दिसून आले आहे की, सतत तणावामुळे धामण्यावर सूज/फुगायला लागतात, जे हृदयविकाराचा झटका आणि कार्डिओ रोगासाठी कारणीभूत ठरू शकतात. शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यासारखी इतर कारणामुळे ही अनेक हृदयरोग होऊ शकतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणती फळं खावी

हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक तत्त्वांचा महासागर असलेली फळं खावीत. ज्यामध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी यांचा समावेश आहे. बेरीमध्ये अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि हृदयविकारास कारणीभूत गोष्टींपासून संरक्षण करतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!