Share

Pankaja Munde | “मी सध्या बेरोजगार आहे, त्यामुळे…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भर कार्यक्रमात हशा पिकला

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद  : बीड येथील परळी शहरात संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचं आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. गेल्या दोन दिवसांपासून पंकजा मुंडे चर्चेत आहेत. एवढंच नाही तर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं आहे. अशातच त्यांनी ट्रोलिंगचा देखील समाचार घेतला. मात्र, त्यांनी केलेल्या विधनांमुळे कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला.

सध्या मी बेरोजगारच आहे, त्यामुळे… – पंकजा मुंडे

काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या, मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल, सध्या मी बेरोजगारच आहे, त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. हे एक तीर में दो निशाण आहे, अशी टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे.

यादरम्यान, पंकजा मुंडेंनी सोशल मीडिया ट्रोलिंग बाबत देखील विधानं केलं आहे. जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं, नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते, आत्ताचं युद्ध वेगळं आहे. सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो, असं पंकजा म्हणाल्या.

काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकतं नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!