Share

“इशारे दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटतील या भ्रमात…”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेत पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज (३ मे) प्रतिक्रिया दिली आहे.

“सभेतून इशारा, धमक्या दिल्या म्हणजे परिस्थती बिघडली असं होत नाही. त्यामुळे आपण इशारे दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटतील अशा भ्रमात कोणी राहू नये,” आज अक्षय्य तृतीया, रमजान आहे. शुभ दिवस आहे. त्यामुळे लोकांना सण साजरा करु द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, “धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही. मात्र त्यांच्या मागील काही शक्ती आहेत ते अस्वस्थ आत्मे आहेत. त्यांना सत्तेवर येता आलं नाही. त्याचं वैफल्य दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढत आहेत. याला शौर्य म्हणात नाहीत. त्यांनी सुपारी देऊन लढायचं असेल तर लढावं. त्यातच त्यांचा वेळ वाया जाणार कारण सरकारचं काम सरकार करत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!