बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलय. या बैठकीवर विनायक मेटे यांनी टीका केलीय. ही मराठा समाजाची दिशाभुल करणारी राजकीय भेट होती, अशी टीका विनायक मेटे यांनी केलीय.
ही बैठक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होती, असा दिखावा केला जातोय. मात्र, या बैठकीमध्ये अनेक विषय होते. त्यात केवळ चव लावण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय दाखवण्यात आला असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे. या भेटीमध्ये ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कार शेड, विमा, जीएसटी असे अनेक विषय मांडण्यात आले असून त्यासाठी ही भेट होती, असा आरोपही मेटे यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी त्यांच्या हातात असलेले महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी देखील मेटे यांनी केली आहे. यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या, फेरविचार याचिका दाखल करा, सोयी-सवलती द्या, अशी विनंती देखील विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींमुळे ‘त्या’ एकरकमी चेकचे ७ हजार कोटी वाचले; आता ठाकरेंनी गरजूंसाठी आर्थिक पॅकेज द्यावे’
- सकारात्मक! उस्मानाबाद जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ
- ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार भारताचा जावई, पहा कोण आहे ‘नवरी’
- मोदी मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त
- ‘शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

