बीड: समाधानकारक पाऊस असूनही शेतकरी बांधव कोरोनाच्या आर्थिक संकटात होरपळला. त्यामुळे खते, बी-बियाणे, औषधी व इतर खरेदी करताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट अथवा फसवणूक होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
सध्याचा काळ हा महागाईचा झाला असून यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे त्यात शेती व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यावर आधीच नैसर्गिक संकट असतेच त्यात आता खतांच्या देखील किंमती वाढल्या असल्यामुळे त्यांच्यावर देखील आर्थिक संकट ओढावले आहे. गतवर्षापासून दुष्काळाचे सावट सरले असले तरी कोरोना महामारीने जीवनमान बाधित केले आहे.
खरीप हंगाम सुरू झाला असून खत, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करू लागला आहे. बोगस बियाणे अवाजवी भाव घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. मशागतीचा खर्च वाढला. अवकाळी वारा, पाऊस, गारा या संकटात सामना करताना शेतकऱ्यांचे नुकसान होते. तरीही न डगमगता चिकाटीने शेतकरी बांधव कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी धडपडत असतो. राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकणाऱ्या शेतकऱ्यांना रास्त भावात व दर्जात्मक खत, बी-बियाणे, कीटकनाशके मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांची कंपन्या व विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी मस्के यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- पहिल्या कसोटीतील बचावात्मक खेळामुळे इंग्लंडची वसीम जाफरने उडवली खिल्ली
- उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल
- परीक्षा न देता रेल्वेत नोकरीची मोठी संधी;अर्ज पाठवण्याची 24 जुनपर्यंत मुदत
- आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्याला ८ बाय-पॅप मशिन!
- नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

