Share

ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार भारताचा जावई, पहा कोण आहे ‘नवरी’

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलु खेळाडु ग्लेन मॅक्सवेलची भारतात चांगलाच लोकप्रीय आहे. नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेत मॅक्सवेलने धडाकेबाज कामगीरी केली होती. मात्र ग्लेन मॅक्सवेल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील वर्षी ग्लेन मॅक्सवेलने त्याची मैत्रीण विनी रमनसोबत साखरपुडा केला होता. महत्वाची बाब म्हणजे विनी रमन ही मुळची भारतीय आहे. त्यामुळे मॅक्सवेल हा भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलने साखरपुड्याचा कार्यक्रम हा भारतीय पद्धतीने केला होता. या कार्यक्रमात त्याचे जवळचे काही मित्रपरिवार आणि कुटुंबीयाचा समावेश होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमात मॅक्सवेलने भारतीय पद्धतीचा पोषाख परिधान केला होता. तर विनी रमणनेही गडद हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता.

https://www.instagram.com/p/B9RSU45lrWz/

२०१७ पासून मॅक्सवेल आणि विनी रमन एकमेकांना डेट करत होते. २०१९ ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात मॅक्सवेल विनीला घेऊन गेला होता. मूळची भारतीय विनी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरामध्ये राहते. २०१९ साली मॅक्सवेलने मानसिकदृष्ट्या खूप खचल्यामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. यानंतर पुनरागमन केल्यानंतर मॅक्सवेलने विनी रमनने तील या सगळ्यातून बाहेर काढण्यात मदत केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!