Share

सकारात्मक! उस्मानाबाद जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ

Published On: 

उस्मानाबाद: कोरोनाची दुसरी लाट आणि त्यात वाढती रुग्ण संख्या यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता काही प्रमाणात ही वाढती रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्याचमुळे आता जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे बरे होऊन घरी जाणारी संख्याही समाधानकारक असून, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अवघी १४७० उरली आहे. जिल्ह्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९५.०८ टक्के झाले आहे. नव्या रुग्णांमध्ये वाढ न झाल्यास आठवड्यात जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या बोटावर मोजण्याएवढीच शिल्लक राहु शकते, अशी आशा आहे. सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात १४२ नव्या रूग्णांची भर पडली असून, मागील काही दिवसांतील ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र सोमवारी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये.

कोरोनाची लाट ओसरत असून, उपचाराखालील रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढल्याचे अहवालातून समोर आले. ९४ टक्क्याच्या आत असलेला रिकव्हरी रेट सोमवारी ९५ टक्क्यांच्या वर गेल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात १४२ नवे रुग्ण आढळले. त्यात उस्मानाबाद तालुक्यात ३४, तुळजापूरमध्ये २३,उमरगा ११, लोहारा १८, कळंब १७, वाशी १५,भूम ९ व परंडा तालुक्यात १५ रूग्णांचा समावेश आहे. मागील काही दिवसांत ६ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, त्याची नोंद सोमवारी घेण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!