Share

मोदी मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबद्दल सविस्तर माहिती दिली.राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय राजकारणातील आरक्षणाचा मुद्यावर चर्चा केली आहे त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले.मुंबईतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी हीच जागा योग्य असून ती द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी मागणी केली. पिक विमामध्ये काही अटी शर्थी आहे, त्याबद्दल चर्चा केली आहे. बीड पॅटर्न सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे, त्याबद्दल कल्पना दिली. राज्यावर नेहमी निसर्ग चक्रीवादळ आणि तौक्ते चक्रीवादळ धडकून गेले. त्यामुळे नुकसान झाले. जी काही मदत दिली जाते त्याचे एनडीआरएफचे निकष बदलण्यात यावे. मागे आम्ही निकष बदलून मदत दिली. त्यात कायम स्वरूपी बदल करावे. १४ व्या वित्त आयोगानुसार थकीत निधी देण्यात यावी अशी मागणी केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!