मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व राज्यांना पूर्णपणे केंद्र सरकार लस पुरवेल, अशी घोषणा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
तर, राज्यासाठी १२ कोटी लस एकरकमी चेक देऊन खरेदी करू शकतो, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आता या १२ कोटी लसींचे तब्बल ७ हजार कोटी रुपये राज्य सरकारचे वाचले असून यातून गरजूंसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे व राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावे व गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 8, 2021
‘१२ कोटी लसी एकरकमी चेक देऊन घ्यायला तयार आहे असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकलाईव्ह मध्ये केल होत. आता नरेंद्र मोदी यांनीच सर्वांना लस देण्याचे ते १२ कोटी लस खरेदी करण्याचे ७ हजार कोटी वाचले या रकमेतून गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे व राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावे व गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा,’ अशी मागणी उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल
- ‘आम्ही आकडे लपवलेले नाहीत,मात्र जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे’
- संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
- महापौरांचा 100% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई – आशिष शेलार
- नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

