औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नाचनवेल गणातील 20 हजार लोकसंख्येचे 13 गावे फुलंब्री तालुक्याला जोडण्याची परिसरातील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. नाचनवेल भाग हा कन्नड शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर असून फुलंब्री 24 किलोमीटर,औरंगाबाद 48 किलोमीटर तर सिल्लोड 27 किलोमीटर अंतरावर आहे.फुलंब्री शहराच्या मानाने या भागातील ग्रामस्थांसाठी कन्नड शहर दूर असून त्यापेक्षा त्यांना बाजारपेठेसाठी फुलंब्री ,सिल्लोड व औरंगाबाद सोयीचे ठरते.केवळ प्रशासकीय कामकाजासाठी या भागातील ग्रामस्थांना मुद्दामहून कन्नडला यावे लागते.
फुलंब्री तालुका झाल्यास यामुळे तालुका व जिल्हा एकाच मार्गावर येणार असल्याने एकाच चक्कर मध्ये दोन्ही कामे होणार असल्याने ही मागणी सोयीची असल्याचे ग्रामस्थांची भूमिका आहे. मुळात कन्नड तालुका तीन प्रादेशिक विभागात विभागला गेला आहे.नागद पंचायत समिती गण हा खांदेश पट्टा, औराळा ,जेहुर हा काळीभुई तर पिशोर चिंचोली करंजखेड व नाचनवेल हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो.या तिन्ही भागातील बोलीभाषा ,बोलण्याचा ढब,चालीरीती भिन्न भिन्न आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात इतकी भिन्नता असलेला दुसरा तालुका नाही.
नाचनवेलहुन कन्नडला येण्यासाठी आता रस्त्याचे काम झाले आहे मात्र हे अंतर जास्त आहे.त्या मानाने फुलंब्री ते पाचोरा हा नव्याने तयार झालेला मार्ग अगदी प्रशस्त असून त्यामार्गाहून फुलंब्री सह औरंगाबादला जाणे सोयीचे व सोपे झाले आहे. या भागातील सुमारे 13 गावातील सुमारे 20 हजार लोकसंख्या फुलंब्री तालुक्याला जोडल्यास हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल अशी ग्रामस्थांची मागणी व भूमिका आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

