लातूर : पुढे ढकलण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या परीक्षांवर अनेक समस्यांचे सावट असणार आहेत. रविवार, सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर शहरात १९ उपकेंद्रावर होणाऱ्या या परीक्षेच्या नियोजनाची तयारी करण्यात आली आहे. १९ केंद्रावर ७ हजार ८९६ विद्यार्थी कोविडचे सर्व नियम पाळून परीक्षा देणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.
परीक्षेच्या अनुषंगाने १९ उपकेंद्र प्रमुख, ८३ पर्यवेक्षक, ३०० समवेक्षक, ५ समन्वय अधिकारी, भरारी पथम प्रमुख व इतर अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. परीक्षेच्या अनुषंगाने १९ उपकेंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. उमेदवारांनी परीक्षेस येताना स्वत:चे मूळ आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यापैकी एक मूळ ओळखपत्र व त्याची एक छायाप्रत सोबत आणावी, असे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

