उस्मानाबाद : देशात वृद्ध लोकांवर वाढत चाललेले अत्याचार चिंतेचा विषय ठरत आहे. अशा प्रकरणात आरोपीना लवकरात लवकर शिक्षा सुनावली पाहिजे. यामुळे गुन्हेगारी वर आळा बसतो. अशीच एक घडलेल्या घटनेत वृद्धेला काठीने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी तरूणास जन्मठेप व ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.उस्मानाबाद येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांनी शनिवारी हा निकाल सुनावला.
उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील बालाजी नवनाथ सरवदे १९ मे २०१६ रोजी गावातील मारूतीच्या मंदिरात झोपला होता. यावेळी गावातील बाबुराव बुर्ले यांनी त्यास उठवले असता त्याने त्यांना शिवीगाळ करीत काठीने जबर मारहाण केली. यावेळी डोक्यात मार लागल्याने बाबुराव बुर्ले हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार त्यांच्या मुलीने पाहिला. तिने तत्काळ या घटनेची माहिती लातूर येथे असलेले तिचा मोठा भाऊ देविदास बुर्ले यांना कळविली.
त्यानंतर तिने तिच्या वडिलांना मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान,लातूर येथे हॉस्पीटलमध्ये कामास असलेले देविदास बुर्ले मुरूड येथे आले. मुरूड येथे प्राथमिक उपचार करून बाबुराव बुर्ले यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालय व नंतर उस्मानाबाद येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुन्हा त्यांना लातूर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. दरम्यान, २० मे रोजी दु.४ वा. उपचारादरम्यान बाबुराव यांचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुस्लिम मुलगा मंदिरात पाणी प्यायला म्हणून जी मारहाण केली गेली त्या घटनेचेही समर्थन करणार आहेत का?’
- ‘हे रामराज्य नाही ! देशाची संस्कृती तर अजिबात नाही, पण बोलायचे कोणी ?’
- अंतिम सामन्यापुर्वी सतत भारतीय संघाला ट्रोल करणाऱ्या वॉनला वसीम जाफरचा टोला
- भारतातील धर्माबद्दल देसी गर्ल प्रियंकाचे मोठे वक्तव्य!
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

