Share

जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस

Published On: 

नागपूर : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे.

तर, मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी अशांतता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील विविध नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. तर, शरद पवार यांची पत्रकार परिषद संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.

‘परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. जेवढ्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण कोण वापरत होत याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. भाजपने आज पासून आंदोलन सुरू केलं ते आंदोलन जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तो पर्यंत सुरू राहील,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ माजली आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!