नांदेड : निवडणुकीतील हिंसाचार आपल्याला माहितीच आहे.पण निवडणूक झाल्यावर त्याचा राग मनात ठेऊन एक युवकाला ठार मारण्याची घटना नांदेड ठेयेथे घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मदत केली असती तर आमचा सरपंच झाला असता असे म्हणत दहा जणांनी मिळून एका २२ वर्षाच्या तरुणावर लोखंडी रॉड,विटकर आणि लाठ्या- काठ्याच्या सहाय्याने हल्ला चढवला. या हल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे मार्च शुक्रवार रोजी रात्री घडली.
योगेश धर्माजी असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी दोन महिलांसह दहाजणांविरोधात खुनाचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींना देगलूरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा आरोपींना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश हा काल शेतातून ट्रॅक्टर घेऊन घराकडे जात असताना योगेशची वाट बघत असलेल्या अभिजीत आचेगावेसह दहा जणांनी योगेश जवळ येताच तू आम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीत का मदत केली नाहीस म्हणून त्याच्यावर लोखंडी रॉड, विटकर आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. त्यात तो जागीच मरण पावला.
महत्वाच्या बातम्या
- “इशान किशन आणि सूर्यकुमार टॉप क्लास खेळाडू”
- एका वर्षानंतर सुशांतच्या आत्महत्येवर क्रितीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…..
- ‘स्व.आर.आर. आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृहखात्याला कलंकित केले’
- आज दिल्लीत अजित पवार, जयंत पाटील यांची शरद पवारांसह तातडीची बैठक
- तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट?, जुई गडकरीचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

