मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, प्रकरण अंगाशी येताच ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली होती यानंतर बचाव करण्यासाठी एक पळवाट देखील काढली होती.परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सांगण्यात आले होते.
दरम्यान,ज्या पत्रावरून खळबळ उडाली त्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली. मात्र, आता परमबीर सिंग यांनी तो ई-मेल माझाच असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित केलेल्या शंकेची हवाच काढून घेतली आहे.
The letter to Maharashtra CM was sent from my email ID, says Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) March 21, 2021
परमबीर सिंग यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना तो ई मेल माझाच आहे, असं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेला मेल हा माझ्याच ई-मेल आयडी वरून पाठवला आहे, असं स्पष्टीकरण परमबीर सिंग यांनी दिलं आहे. परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणामुळे हे प्रकरण चांगलंच तापणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सामना गमावल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचं मन जिंकणार वक्तव्य
- जिल्हा बँक निवडणुकीला गालबोट; भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

