Share

कोरोनाच्या साथीतही मिळतिये गावकऱ्यांची साथ! कुसळंब येथे उभारले ५१ खाटांचे कोविड केअर सेंटर

Published On: 

बीड: शहरासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे येथील परिस्थिती आता चिंताजनक होत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र रुग्णालये हाऊस फूल असल्याने नवीन रुग्णांना जागा मिळत नाहीये. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहेत.पाटोदा तालुक्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे येथील ग्रामीण भागातच सेंटर सुरु करण्यात आले आहे.

तालुक्यातील रुग्णांसाठी केवळ पाटोदा येथे कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचार सुरु होते. या यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी तसेच कुसळंब व परिसरातील खेडेगावातील रूग्णांना उपचार मिळावेत, यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने ५१ खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढती रूग्णसंख्या पाहता पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड सेंटर सुरू होणे गरजेचे असल्याचे पाहून कुसंळब गावाने कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.

कुसळंब हे गाव आजूबाजूच्या वीस गावांसाठी केंद्रस्थानी असल्याने बरेचसे व्यवहार याठिकाणी अवलंबून आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून ग्रामस्थांची ये-जा येथे असते. सरपंच शिवाजी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून गावचे भूमिपुत्र असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांची भेट घेऊन गावातील शाळेत कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी गावात जाऊन बैठक घेतली. गावकऱ्यांशी चर्चा करून कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली. जिल्हा आरोग्य अधिकारी असलेल्या राधाकिसन पवार यांनी सरकारी कार्यवाही पूर्ण करून गावातील खंडेश्वर विद्यालय येथे २२ एप्रिल रोजी कोविड केअर सुरू करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सातत्याने पुढाकार घेत आहे. कुसळंब ग्रामस्थांनी स्वत:हून पुढे येत कोविड केअर सेंटरसाठी पुढाकार घेतल्याने परिसरातील गावच्या रुग्णांना दिलासा मिळेल. या ठिकाणी कार्यरत प्रत्येकाने चांगले काम करावे. ग्रामस्थांचे निश्चित आशीर्वाद मिळतील.’ – आर.बी.पवार, जि. आरोग्य अधिकारी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!