मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक संकटे येत असून राज्य सरकार त्याला तोंड देखील देत आहे. मात्र राज्यात सत्ता असूनही सध्यस्थितीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजपने केली होती.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार झाला असून अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर, राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने स्थिती आटोक्यात येताना दिसत असली तरी धोका मात्र अद्याप कायम आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी आज मला फोन करून राज्यातील कोरोना परिस्थिती प्रतिबंधात्मक उपाययोजनांची घेतली माहिती. मविआ सरकार पारदर्शकपणे कोविड परिस्थिती हाताळत असल्याबाबत समाधान व्यक्त करून अधिक काळजी घेत, वेगाने सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 27, 2021
यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनद्वारे महत्वाची चर्चा केली आहे. याबाबत खुद्द थोरात यांनी माहिती दिली आहे. ‘सोनिया गांधी यांनी आज मला फोन करून राज्यातील कोरोना परिस्थिती प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. मविआ सरकार पारदर्शकपणे कोविड परिस्थिती हाताळत असल्याबाबत समाधान व्यक्त करून अधिक काळजी घेत, वेगाने सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली,’ असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात बसून नगरची मापं काढणं बंद करा; जयंत पाटलांच चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर
- ‘कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही’, मंत्री जयंत पाटील यांचा निर्धार
- ‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?
- राज्यात १ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणात अडथळा ? राजेश टोपेंच महत्वाचं भाष्य
- दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवलाय, आता तिसऱ्या लाटेआधी…; राजेश टोपेंच सूचक विधान


