Share

चांगली बातमी! परभणीत एका आठवड्यात साडेपाच हजार रुग्णांची कोरोनावर मात

Published On: 

परभणी : परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये कोराेना रुग्णांची संख्या घटत आहे, यातच मागच्या आठवड्यामध्ये साडेपाच हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आढळुन आले आहे. कोराना मुक्त होण्याचा दर वाढल्याने परभणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

कोरोना रुग्णांचा वाढीचा कहर झाला होता. त्यामुळे परभणीकरांमध्ये भितीचे वातावरण होते. कोराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. तर २२ एप्रिल रोजी विक्रमी १ हजार २२० रुग्ण वाढीची नाेंद झाली होती. तर या बरोबरच कोरोना रुग्णांचा मृत्यू दर देखील खुपच वाढला होता. त्यामुळे रुग्णांलह आप्तस्वकीय तसेच नागिरांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यातच मागच्या आठवड्यामध्ये मात्र सुखद घटना घडली आहे, ती म्हणजे साडे पाच हजार रुग्ण हे कोराना मुक्त झाले आहेत. दरम्यान १९ ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये ४ हजार ८८० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर मागच्या आठवड्यात ११ ते १८ एप्रिल मधील या आठ दिवसामध्ये ३ हजार ९८७ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठड्यात १ हजार ५६९ पेक्षा अधिक रुग्ण कोराेना मुक्त झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने परभणीकरांना दिलासा मिळाला आहे. हे मात्र नक्की. दरम्यान दोन आठवड्यापुर्वी बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यापर्यंत घसरले होते. जानेवारी – फेब्रुवारीदरम्यान ९३ टक्के कोराना मुक्त होण्याचे प्रमाण झाले होते. तर आता कोराना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७६. ९६ टक्के झाले होते. या मध्ये फार मोठी वाढ झालेली नाही, परंतू ही परभणी शहरासह जिल्ह्यासाठी दिलासा मिळणारी बाब म्हणावी लागेल, यात मात्र शंकाच नाही.

महत्त्वाच्या बातम्या  

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!