मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने स्थिती आटोक्यात येताना दिसत असली तरी धोका मात्र अद्याप कायम आहे.
यापार्श्वभूमीवर लसीकरण व कोरोना स्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवलाय. त्यामुळे तिसऱ्या लाटेआधी फार मोठी तयारी ऍडव्हान्समध्ये करून ठेवावी लागेल, असं भाष्य राजेश टोपे यांनी केल्यामुळे दुसऱ्या लाटेतून सावरतो ना सावरतो तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता बळावत आहे.
पुढे ते म्हणाले, ‘काही गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत. उदाहरणार्थ, ऑक्सिजन. ऑक्सिजन राज्यात जेवढा निर्माण होतो तेवढा आम्ही देऊ शकतो मात्र राज्याबाहेरून ऑक्सिजन देण्यासाठी केंद्र सरकारची मध्यस्थी गरजेची असते. रेमडेसिवीरबाबतचे सर्व अधिकार केंद्राने आपल्या हातात घेतले आहेत. त्यामुळे या दोन गोष्टी पुरवण्याचा अधिकच केंद्राच्या हातात असल्याने आम्ही काय करू शकतो ? लागल्यास ज्यादा पैशाने विकत घेऊ शकतो मात्र आपत्ती कलमाअंतर्गत योग्य पुरवठा केंद्राकडून झाला पाहिजे,’ असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात बसून नगरची मापं काढणं बंद करा; जयंत पाटलांच चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर
- ‘कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही’, मंत्री जयंत पाटील यांचा निर्धार
- ‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?
- राज्यात १ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणात अडथळा ? राजेश टोपेंच महत्वाचं भाष्य
- मोफत लसीकरणावर इतरांनी बोलणं टाळलेलं बरं; अजितदादांची मविआ नेत्यांनाच तंबी


