बीड: रेमेडेसिवीर इंजेक्शनच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी दीपक थोरात यांनी केली होती मात्र चौकशी करण्यात आली नाही तसेच जिल्हा रुग्णालयाच्या कंत्राटी नोकर भरतीत देखील गैरव्यवहार झाला असून त्याची पण चौकशी करावी अशी मागणी दीपक थोरात यांनी केली होती. अखेर चौकशी न झाल्याने थोरात यांनी जिल्हा रुग्णालयासमोर विषारी द्रव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच इतरांनी त्यांना रोखले आणि आता उपचाराखाली ठेवण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड काळातील कंत्राटी पद भरती सुरू आहे. यात गैरव्यवहार झाला असून गुणवत्ताधारकांना डावलून इतरांना नियुक्ती दिल्याचा आरोप दीपक थोरात यांनी केला होता. जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनचाही काळाबाजार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणात त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या सर्व प्रकरणास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, औषधनिर्माता आदिनाथ मुंडे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी थोरात यांनी केली होती. तक्रार केल्यामुळे, तू तक्रार का केली म्हणून आपल्याला दोन जणांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दीपक थोरात यांनी केला आहे. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दिली आहे.
कारवाई न केल्यास २६ एप्रिल रोजी आत्मदहन किंवा आत्महत्या करू, असे दीपक थोरात यांनी सांगितले होते. कारवाई न केल्याने सोमवारी दीपक थोरात यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षासमोर विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच भरती अथवा रेमडेसिविर प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नाही. आरोप तथ्यहीन आहेत. थोरात यांना धमकी कुणी दिली याबाबत आपल्याला काही कल्पना नाही, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवलाय, आता तिसऱ्या लाटेआधी…; राजेश टोपेंच सूचक विधान
- संकटाच्या वेळी ‘मूकदर्शक’ राहू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा मागितला आराखडा
- बीडकरांचे डोळे आसुसले रेमेडेसिवीरसाठी
- ‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?
- पुण्यात बसून नगरची मापं काढणं बंद करा; जयंत पाटलांच चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

